load shedding lights in solapur

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

काही गावांमध्येच लोड शेडिंग का? 'हे' आहे मुख्य कारण; सिंगल फेजवर कृषीपंप जोडणी, आता वीज चोरी थांबली नाही तर पावसाळ्यातही गावे राहणार अंधारात, वाचा...

शेती व घरगुती विजेचे कनेक्शन एकाच लाइनवरून (फीडर) आहे, त्या गावांमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत विजेचा वापर वाढला आहे. अनेकजण सिंगल फेजवर कृषीपंप जोडत आहेत, तर काहीजण तारांवर आकडे टाकून वीज चोरी करीत आहेत. आता अशा गावांमधील वीज चोरी कमी झाल्याशिवाय तेथील लोडशेडिंग थांबणार नाही, असे ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शेती व घरगुती विजेचे कनेक्शन एकाच लाइनवरून (फीडर) आहे, त्या गावांमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत विजेचा वापर वाढला आहे. अनेकजण सिंगल फेजवर कृषीपंप जोडत आहेत, तर काहीजण तारांवर आकडे टाकून वीज चोरी करीत आहेत. आता अशा गावांमधील वीज चोरी कमी झाल्याशिवाय तेथील लोडशेडिंग थांबणार नाही, असे ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

‘महावितरण’ने गावागावांमध्ये ‘आरडीएसएस’ योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत वीज बिलिंग अचूक व्हावे, वीज गळती थांबावी यासाठी वीज ग्राहकांच्या घरी व कार्यालयांमध्ये आधुनिक स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. तसेच वीज वितरण जाळ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे, जुन्या वाहिन्या बदलणे आदी कामेही केली जात आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत व स्वतंत्र वीजपुरवठा मिळावा म्हणून कृषी फीडरचे विलगीकरण केले जात आहे. मात्र, काही गावांमध्ये या कामांना विरोध झाला. अनेकांनी आमच्या जमिनीत विजेचे खांब उभारू नयेत, अशी भूमिका घेतली होती. परंतु, आता लोडशेडिंग सुरू झाल्याने अनेक गावांनी ‘आरडीएसएस’ची कामे करण्याचा आग्रह धरला आहे.

शेती व घरगुती विजेचे फीडर वेगळे केल्यानंतर गावांचा वीजपुरवठा २४ तास सुरळीत राहणार आहे. मात्र, ज्या गावांमध्ये शेती व घरगुती कनेक्शन एकाच फीडरवर आहे, तेथील वीज चोरी न थांबल्यास वीज कपात उन्हाळा असो वा पावसाळा, सुरूच राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तरच वीजपुरवठा सुरळीत होईल

सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये सध्या रात्रीच्या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त वीज वापर होत आहे. ज्या गावांमध्ये सिंगल फेजवर गावठाणातील घरगुती कनेक्शन आणि शेतीचे कनेक्शन एकत्रित आहेत, तेथे अशी स्थिती आहे. त्यामुळे वीज चोरी रोखण्यासाठी त्या फीडरवरील वीज सायंकाळी ६ ते रात्री सव्वानऊ किंवा दहा वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. गावकऱ्यांनी वीज चोरी रोखण्यासाठी ‘महावितरण’ला सहकार्य केल्यास वीजपुरवठा सुरळीत राहील.

- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

चार तासांचे लोडशेडिंग, तरीही विजेचा लपंडाव

शेती व घरगुती विजेची लाईन एकत्रित आहे, अशा गावांमधील फीडर काही तास बंद ठेवले जात आहेत. मागील दोन महिन्यांपासून लोडशेडिंगचा अनुभव गावकरी घेत आहेत. सायंकाळी ६ वाजता गेलेली वीज रात्री १० वाजता येते. तरीही मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत किमान ८ ते १० वेळा वीज ये-जा होत असल्याचा अनुभव गावकरी सांगत आहेत.

सोलापुरातील ‘महावितरण’ची स्थिती

  • एकूण फीडर

  • १,५०२

  • शेती-घरगुती एकत्रित फीडर

  • ६७१

  • शेती-घरगुती स्वतंत्र फीडर

  • ४७४

  • भारनियमनाची वेळ सायंकाळी

  • ६ ते रात्री १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT