Pankaja and Pritam Munde News esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja-Pritam Munde : मुंडे भगिनी सावरकर गौरव यात्रेला अनुपस्थित; खरं कारण आलं समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः भाजपच्या वतीने राज्यभरात सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. आज बीडमध्येदेखील ही यात्रा निघाली. मात्र या यात्रेला खुद्द भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे अनुपस्थित होत्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर भाजपमधमून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आलीय. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे ही यात्रा निघत आहे. आज बीडमध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

बीडमध्ये निघालेल्या सावरकर गौरव यात्रेला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची अनुपस्थिती होती. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत सुप्त कलहामुळे मुंडे भगिनींनी गौरव यात्रेकडे पाठ फिरवली का? असा प्रश्न उपस्थित होत होता.

मुंडे भगिनी बीडमधील सावकर गौवर यात्रेला उपस्थित न राहण्याचं कारण समोर आलेलं आहे. दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे प्रीतम मुंडेंना अधिवेशन सोडून येता येत नाही. पक्षाचा व्हिप असल्यामुळे त्या येऊ शकत नसल्याचं त्यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय.

तर पंकजा मुंडे ह्या मुंबईत भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजर होत्या, त्यामुळे त्याही बीडमध्ये जावू शकल्या नाहीत. तसंही मुंडे भगिनींचं कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नव्हतं. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीही शक्यताही नव्हतीच, असं सांगण्यात येतंय. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Maharashtra 2026 : मॉन्सून केरळमध्ये ४ दिवस आधीच पोहोचणार, पण महाराष्ट्रात कधी दाखल होणार? नवी अपडेट समोर

Latest Marathi News Live Update : डिझेलसाठी सातबारा मागणाऱ्या पंपचालकांवर कारवाई होणार

Maharashtra Electricity: थेट ग्राहकांना शॉक! महावितरणची वीजगळती १५% वर; ८०० कोटींचा थेट भुर्दंड ग्राहकांवर..

Bharat Forecast System : हवामानाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला मिळालं 'ब्रह्मास्त्र'; IITM च्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे आता काळजी मिटली, पाहा काय आहे नवीन प्रणाली?

Maharashtra Politics: आमदार होईपर्यंत अनवाणी’ संकल्प पूर्ण; नवसपूर्तीप्रसंगी नेता अन् कार्यकर्त्याच्या डोळ्यांत आश्रू, शिर्डीत निष्ठेचे अनोखे दर्शन..

SCROLL FOR NEXT