ashish shelar esakal
महाराष्ट्र बातम्या

कालच्या तमाशाची CBI चौकशी का होऊ नये? - आशिष शेलार

विनायक होगाडे

मुंबई: काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि जामिन या प्रकरणावर आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतलीय. सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करु, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिलाय.

त्यांनी म्हटलंय की, ज्यापद्धतीने राणे साहेबांना अटक केलीय त्यामध्ये तीन गोष्टी प्रमुख स्पष्ट होतात की, आयपीएस अधिकाऱ्यांवर सरकारमधील मंत्र्यांचा दबाव दिसून येतो. दुसरं असं की, अनिल परब गृहमंत्री नाहीत, तरीही आधीच मंत्रीमहोदय सांगतायत की अटकपूर्व जामीन नाकारण्यात येणारे. त्यामुळे यात मंत्र्यांचा हस्तक्षेप असण्याची शक्यता दाट आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अंतिमत: आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. राज्याचे एक मंत्री निवाडा जाहिर करतात, हे प्रकरण संशयास्पद आहे. या सगळ्या प्रकरणात निवाडा होण्याआधीच परब यांची ही निकाल जाहीर करण्याची भुमिका ही न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. न्यायालयाची बदनामी, अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या सगळ्याची सीबीआय चौकशी का होऊ नये? असा सवाल त्यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्रे लिहू

पुढे त्यांनी म्हटलंय की, कालपासूनचा तमाशा पाहतोय. मा. राणे साहेबांच्या वक्तव्यावर हा राग आहे की, राणे साहेबांच्या वाक्यावरचा राग नसून मुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यदिनाबाबतच्या अज्ञानाबद्दल हा थय्यथय्याट आहे? मुख्यमंत्री स्वत:च्या अज्ञानाबाबत क्षमायाचना करणार आहात का? त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्रे लिहणार आहोत. हा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे, हे लक्षात ठेवा, असं लिहून पत्र पाठवणार आहे. त्यानंतर त्यांना बोचतील असे फुलांचे काटे पाठवण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Crime News: लग्न जमत नव्हत... शेवटी ठरलं पण पत्नी निघाली 'दरोडेखोर वधू', नवरा लावायचा नवीन तरुणांशी लग्न! अशा प्रकारे झाला पर्दाफाश

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT