Corona_Remdisivir 
महाराष्ट्र बातम्या

‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?

दीपा कदम

मुंबई : ‘‘कोरोना संसर्गामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जात असेल, तर त्याला रेमडेसिव्हिर जीवदान देवू शकत नाही. कोरोनावर रामबाण ठरेल असे कोणतेही औषध जगात उपलब्ध नाही. रेमडेसिव्हिरमुळे एक दिवस अगोदर रुग्ण बरा होवू शकतो, म्हणजे बुधवारी बरा होणारा रुग्ण मंगळवारी बरा होतो, एवढाच त्याचा फायदा असल्याची स्पष्टोक्ती डॉ. अविनाश सुपे यांनी केली, पण संसर्गामुळे शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णाला वाचविण्यासाठी या औषधांचा उपयोग होत नसल्याचे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टर सुपे कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या ऑडिट समितीचे प्रमुख आहेत. डॉक्टर सुपेंनी रेमडेसिव्हिरच्या परिणामकारकतेविषयी सांगितले, ''रेमडेसिव्हिर हे औषध कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठीचा फॉर्म्युला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. मात्र याचा सर्रास वापर केला जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.''

ते म्हणाले, ‘‘आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं चुकीच्या पद्धतीने बाजारीकरण करुन साठेबाजी, काळाबाजार केला जात आहे. हे रोखण्यासाठी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही पुढाकार घेतला पाहिजे. रेमडेसिव्हीर कधी वापरले जावे, याविषयी राज्य सरकारची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि रुग्णालयांनी रुग्णाला हे इंजेक्शन द्यावे.’’

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT