Solapur Crime. sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल! पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह मेव्हण्याला जन्मठेप; सरकारी वकिलांचा दमदार युक्तिवाद

पती श्रीकांत यलगोंडे याचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी श्रीकांत यलगोंडे (वय २७) व तिचा भाऊ विजयकुमार राजेंद्र पाटील (वय २२) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आय. एम. शेख नाझीर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

तात्या लांडगे

सोलापूर : पती श्रीकांत यलगोंडे याच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर, फॅनचा गट्टू, कंबरेचा पट्टा व दगडाने मारून त्याचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी श्रीकांत यलगोंडे (वय २७) व तिचा भाऊ विजयकुमार राजेंद्र पाटील (वय २२) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आय. एम. शेख नाझीर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

जुळे सोलापुरातील रोहिणी नगरात शिक्षक सोसायटीत श्रीकांत व अश्विनी भाड्याने राहायला होते. श्रीकांतला दारूचे व्यसन होते. श्रीकांत हा पत्नी अश्विनीवर संशय घेत होता. त्यावरून तो अश्विनीला मारहाण, शिवीगाळ करायचा. त्यामुळे अश्विनीने २९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरात भाऊ विजयकुमार पाटील याच्या मदतीने श्रीकांतला जबर मारहाण केली. विजयकुमारने कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. जखमी श्रीकांत उठून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अश्विनी व विजयकुमार या दोघांनी त्याला नादुरुस्त प्लेटने व दगडाने डोक्यात मारहाण केली. श्रीकांतच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्यानंतर आरोपींनी त्याला ओढून बाथरूममध्ये टाकले. तो ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात ओढणी कोंबली होती. अश्विनीने श्रीकांतच्या अंगावर पाणी ओतून सगळे रक्त धुऊन काढले. त्याच्या अंगावरील कपडे देखील धुऊन काढून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

अश्विनीने ३० ऑगस्टला श्रीकांतच्या नातेवाइकांना कॉल करून श्रीकांत बाथरूममध्ये पडला असून, त्याला मार लागल्याचे सांगितले. नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांना दुर्गंधी आली आणि अश्विनीने खोटे सांगितल्याची जाणीव त्यांना झाली.‌ मल्लिनाथ यलगोंडे पोलिसांत फिर्याद द्यायला निघाल्यावर ‘पोलिसांना सांगू नका, आमच्या भविष्याचा विचार करा’ म्हणून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज मुलाणी यांनी ८ सप्टेंबरला फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. सरकारतर्फे १२ साक्षीदार तपासले. मृतदेहाचा उत्तरीय तपासणीचा अहवाल, डॉ. व्ही. व्ही. राठोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच स्क्रू ड्रायव्हर, फॅनचा गट्टू, श्रीकांतच्या अंगावरील जखमा पाहून त्याचा खून एकापेक्षा अधिक व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाले.

सरकारी वकील गंगाधर रामपुरे यांनी युक्तिवाद करताना आरोपी अश्विनीने खून केल्याबाबत काहीही योग्य खुलासा केलेला नाही, खून झाला त्यावेळी ती घरात नसल्याचेही नाकारत नाही. त्यामुळे भारतीय पुरावा कायद्यानुसार आरोपींनी मिळून श्रीकांतचा खून केल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयासमोर मांडले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडेही सादर केले. त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे ॲड. गंगाधर रामपुरे, ॲड. कविता बागल आरे यांनी काम पाहिले. पोलिस नाईक एस. एस. घाडगे यांनी कोर्टपैरवी म्हणून मदत केली.

आठ वर्षांचा चिमुकला पोरका

अश्विनी व श्रीकांत यांना एक मुलगा आहे. त्या चिमुकल्याचाही विचार न करता पत्नी अश्विनीने पती श्रीकांतचा खून केला. या गुन्ह्यात चिमुकल्याची आई अश्विनीला जन्मठेप झाली असून वडील श्रीकांतचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो आठ वर्षांचा चिमुकला पोरका झाल्याने नातलगांनी हळहळ व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT