wildlife in maharashtra are corona negative  
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील वन्यप्राणी कोरोना निगेटिव्हच, जंगल भ्रमंती सुरू झाल्यानंतर नेमकी कशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी?

राजेश रामपूरकर

नागपूर : अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयातील बिबट्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, राज्यातील प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना कोरोना होऊन नये म्हणून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील वन्यप्राणी कोरोनापासून सुरक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे. 

अमेरिकेतल्या प्राणी संग्रहालयात वाघाला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त एप्रिल महिन्यात समोर आले होते. वाघाला कोरोनाची लागण, त्याची देखरेख करणाऱ्या झू-कीपरकडूनच झाली होती. माणसापासून प्राण्याला कोरोनाची लागण होऊ शकते अशी ती पहिली घटना समोर आली होती. त्यानंतर जंगलातील वन्यप्राणी आणि प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता लक्षात घेता, केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिलेल्या सूचनेनुसार देशातील जंगल पर्यटन बंद आणि प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले होते. 

जून महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी काही अटी व नियमांचे पालन करीत जंगल भ्रमंतीला एनटीसीएने व राज्य सरकारच्या परवानगीने भ्रमंती सुरू केली होती. आता संपूर्ण देश अनलॉक झालेला असताना आता पुन्हा अमेरिकेतील लुईसाविला या प्राणिसंग्रहालयातील बिबट्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या बिबट्यासह दोन बिबट्यांना श्वसनाचा आजार दिसून आलेला आहे. त्याचेही नमुने घेण्यात आलेले आहेत. एक बिबट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली असताना त्याला विलगीकरणात ठेवले आहे. एखाद्या कोरोनाची लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्याकडून लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील प्राणीसंग्रहालयाच्या आढावा घेण्यात आला. तेव्हा राज्यातील एकाही प्राणिसंग्रहालयातील वाघ, बिबटासह इतरही वन्यप्राण्यांना कोरोना झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

याबाबत गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये म्हणाले, गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परिसराचे निर्जंतुकीकरण, कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी, मांसाहारी आणि शाकाहारी आहाराची तपासणी, सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत आहे. काळजी करण्याचे कारण नसून अद्यापही कोणत्याही प्राण्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. पशुवैद्यक डॉ. विनोद धूत म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही वन्यप्राण्यांच्या संपर्कात येऊ देत नाही. वेळोवेळी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही निर्देश दिले होते. त्यानुसार काळजी घेतली जात असून राज्यात अद्याप एकाही प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. 
-नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT