ajit pawar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? राष्ट्रवादीच्या आमदाराच्या विधानानं खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी बंड केल्यानं आता राज्याच्या राजकारणात नवी खेळी सुरु होत आहे. अजित पवार हे राजभवनात दाखल झाले आहेत. पण ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तसं विधान केलं आहे. त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.

राज भवनात उपस्थित अमोल मिटकरी म्हणाले, "अजित दादा म्हणजे पक्ष आहे, पक्ष म्हणजे दादा आहेत. मला खरंच माहिती नव्हतं आम्ही काल एक मिटिंग करुन आलो. सकाळी आम्हाला मिटिंगमध्ये कळलं की आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचं आहे. अजित दादांनी मुख्यमंत्री व्हावं अस मला वाटतं.

मला असं वाटतं की, मुख्यंमत्रीपदाची शपथ त्यांनी घ्यावी आणि महाराष्ट्राला न्याय देण्याचा आजपर्यंत यांच्याकडून जो प्रयत्न झाला नाही तो प्रयत्न दादांनी करावा. मला विश्वास आहे की अजितदादा मुख्यमंत्री झाल्यानंतरच महाराष्ट्र वळणावर येईल. राज्याला दोन उपमुख्यमंत्री व्हावेत यामध्ये मुख्यंमत्री अजित पवार व्हावेत आणि उपमुख्यमंत्री भाजप आणि शिंदे गटाचा असावा. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी मी पांडुरंगाला साकडं घातलं आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT