Ajit Pawar, Sharad Pawar and Devendra Fadnavis  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: फडणवीस अन् अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा होणार का? शरद पवार म्हणाले...

राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार का यावर? शरद पवारांचे मोठे विधान

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात आजही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आहे. त्या शपथविधीवरून आजही आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतात. तसेच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबाबत वेगळी भूमिका घेत असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना एका मुलाखतीत पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी होणार का? या प्रश्नावर पवारांनी गुगली टाकली आहे.

भविष्यात भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करेल का? यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मोठं वक्तव्य केलं आहे. ''भविष्यात कोणी काय निर्णय घेईल? याबाबत आत्ता सांगता येणार नाही'', असं ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची चर्चा राज्याच्या राजकारणात संध्या चर्चा रंगली आहे.

यावेळी भाजपबरोबरच्या आघाडीवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, ''भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आत्ता सांगता येणार नाही. सध्या तरी महाविकास आघाडी एकत्र आहे. कोण कशी भूमिका घेईल याबाबत आज सांगता येणार नाही. हे तीन पक्ष एकत्र आहेत, यांच्या सहकाऱ्यांची जो पर्यंत एकत्रित काम करण्याची इ्च्छा आहे, तोपर्यंत मला काळजी नाही'', असंही पवार म्हणालेत.

''पण जर कोणी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल. तो निर्णय महाविकास आघाडीतील पक्षाचा नसणार, असं मोठं विधान शरद पवार यांनी यावेळी केलं.

तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांच्या जागावाटपाबद्दलही भाष्य केलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील जागा वाटपांबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आज ते एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सर्व दावे खोडून काढले आहेत. 'पण 15 मिनिटांनी पाऊस पडेल का, हे मीही सांगू शकत नाही', अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT