pankaja munde 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : विधानसभा 2024 च्या निवडणुकीआधी अशीच यात्रा काढणार; पंकजा मुंडेंची घोषणा

रवींद्र देशमुख

नाशिक : 2019 ला ठरवलं होतं की अशी मला यात्रा करावी लागेल. आता अजून एक यात्रा मी 2024 या विधानसभेच्या अगोदर करणार असल्याचे घोषणा पंकजा मुंडे यांनी सिन्नर येथील नांदूर शिंगोटे येथील गोपीनाथ गडावरील सभेत केली.

आपल्या देशामध्ये जातीवरून वाद चालू आहे. मात्र मी आदिवासी बहिणींसोबत नृत्य केलं. मी आता बुद्ध विहारात जावून भगवान बुद्धांचं दर्शन केलं. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना फुलं वाहिली. सध्या प्रत्येक माणूस दुसऱ्याला शिव्या देतोय. तु चुकलास? तु का चुकला होतास? चुकांची स्पर्धा कशाला लावता. तु कांद्याला भाव किती दिली होता. त्यापेक्षा जास्त भाव मी देईल, अशी स्पर्धा लावा, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

दरम्यान निस्वार्थ आणि निष्कलंक तसेच निस्सीम भक्ती मुंडे साहेबांच्या वाट्याला आली आणि माझ्या वाट्याला शक्ती आली. या शक्तीचा मी सन्मान करते. तुमचे आशीर्वाद घेऊ पुढं जाते. मी वचन देते, तुमची मान खाली जाणार नाही. स्वाभिमानानेच जगू, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

पकंजा मुंडे पुढं म्हणाल्या की, सर्वांगीण विचार करायला पाहिजे. मला अशी यात्रा करावी लागले, हे मी २०१९ मध्येच ठरवलं होतं. आणखी २०२४च्या विधानसभा निवडणुकीआधी मी पुन्हा यात्रा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी केली. त्या यात्रेला काय नाव देईल, हे तेव्हाच सांगेल, असही पंकजा यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT