Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांना इशारा

राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही,’’ असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही,’’ असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांसाठी दरवाजे बंदच असतील असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. प्रकल्पांच्या नावाखाली गद्दारांचे सरकार माझ्या महाराष्ट्राला लुटत आहे. मात्र एक महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्याचा हिशेब मांडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

आमदार अनिल परब यांच्या विधानपरिषद निवडणूक काळातील वचनपूर्तीनिमित्त ठाकरे यांच्या शिवसेनेचा महानोकरी मेळावा पार पडला. ते म्हणाले की, आपले सरकार पाडल्यानंतर एकही नवा उद्योग राज्यात सुरू झाला नाही. आपण जे काही मोठे प्रकल्प आणले ते गुंतवणूकदारसुद्धा राज्यातील अस्थिर वातावरणात यायला तयार नाहीत. 

भाजपवर आरोप

‘‘आज एका बाजूला पंतप्रधान त्यांच्या कंत्राटदार मित्राचे खिसे भरायला येत आहेत. आपले हिंदुत्व लोकांच्या घरची चूल पेटविणारे असून भाजपचे हिंदुत्व हे घर पेटविणारे आहे. म्हणूनच त्यांना शिवसेना संपवायची आहे,’’ असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai–Pune Expressway: ३२ तास रस्ता बंद, लोक रस्त्यावर अडकले… राज ठाकरेंनी मागितला टोल परतावा; सरकारच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न

महाराष्ट्राचे १५ आमदार लंडन दौऱ्यावर जाणार, यादी आली समोर; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

Yashwantrao Chavan Open University : मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राडा! 'आम्ही फक्त टाळ्या वाजवायला आलोय का?' पदवीधरांचा संताप

Tech Tips : लॅपटॉप अन् कॉम्प्युटर खराब होऊ नये असं वाटतं ना? मग कीबोर्डच्या 'या' 10 बटणांना अजिबात हात लावू नका

SCROLL FOR NEXT