महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार फेरविचार करणार! तासाभराच्या बैठकीनंतर अजित पवारांकडे दिला 'हा' निरोप

NCP News: शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले आहेत. 'सिल्व्हर ओक'बाहेर कार्यकर्त्यांनी धरणं दिले आहेत.

संतोष कानडे

मुंबईः शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले आहेत. 'सिल्व्हर ओक'बाहेर कार्यकर्त्यांनी धरणं दिले.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केलं होतं. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत.

'आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.' असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असंही पवारांनी सांगितलं आहे. दोन-तीन दिवसांमध्ये निवृत्तीबाबात शरद पवार निर्णय घेणार आहेत.

त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणं धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता पवारांच्या आगामी भूमिकेकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT