महाराष्ट्र बातम्या

Monsoon Assembly Session: राज्यात लवकरच कॅसिनो सुरू होणार? शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात 'कॅसिनो'ला मिळणार परवानगी?

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे. या पावसाळी अधिवेशनात एकूण २४ विधेयके आणि ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र 'कॅसिनो' नियंत्रण व कर सुधारणा विधेयकाचा समावेश असल्याने राज्यात कॅसिनोला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.  (Marathi Tajya Batmya)

मात्र अद्याप हे विधेयक सभागृहात मांडण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेणे बाकी आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी फेब्रवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती.(Latest Marathi News)

राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्र कॅसिनोज(नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा १९७६ पासून आहे. पण त्याची अधिसूचना काढलेली नाही. या कायद्यात कॅसिनोसाठीचा परवाना प्रक्रीया, आकारले जाणारे शुल्क, तसेच परवाना रद्द करण्याच्या नियमांचा समावेश आहे.

अमेरिका, मलेशिया, थायलंड, मकाऊ यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या देशांमध्येच नव्हे, तर आपले शेजारी राज्य असलेल्या गोवा, सिक्किम, मकाऊ, नेपाळमध्ये कॅसिनो गेमिंगला परवानगी असल्यामुळे तिथे मोठया प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झाल्याचे पत्रात म्हटले होते. (Marathi Tajya Batmya)

देशात आँनलाइन गेमिंगच्या पार्श्वभूमीवर कॅसिनोला परवानगी द्यायला हवी. कायदा नसल्याने राज्याचा जवळपास ३ ते ३.५० हजार कोटींचा व्यवसाय बुडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक येते का आणि त्यास मंजुरी मिळते का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT