cm Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur : मुख्यमंत्री दिलासा देणार का? परजिल्ह्यात अडकलेल्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबविण्याची मागणी

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नवीन शिक्षक भरतीपूर्वी राबवावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नवीन शिक्षक भरतीपूर्वी राबवावा. तसेच २०२२ मध्ये अर्ज न केलेल्या शिक्षकांना अर्ज करण्याची तर अर्ज केलेल्यांना त्या अर्जात बदल करण्याची संधी द्यावी, अशीही मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ग्रामविकास विभागाच्या १२ ऑक्टोबरच्या पत्रानुसार शासन बदलीचा सहावा टप्पा सध्या राबवत असून २०२२ मध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांचाच विचार करुन तो टप्पा राबविला जात आहे. बदल्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे, अशा प्रकारची दिशाभूल केली जात आहे. सध्या अनेक जिल्ह्याची बिंदुनामावली अपूर्ण असून त्याला मागासवर्गीय कक्षाची अंतिम मान्यता मिळालेली नाही.

तरीपण, ग्रामविकास विभागाने १२ ऑक्टोबरला न्यायालयात दिलेल्या पत्रानुसार २०२२ ची प्रक्रीया पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. २०२२ मध्ये अनेक शिक्षकांनी स्वत:च्या जिल्ह्यात जागा नसल्याने ऑनलाईन अर्ज केला नव्हता. काही शिक्षकांनी त्यावेळी चार जिल्ह्यांचे पर्याय निवडून शेजारील जिल्ह्याचा पर्याय दिला होता.

काही शिक्षकांचे संवर्ग बदलेले असून काहींचे अर्ज चुकल्याने ते बाद ठरले आहेत. २०२२ ला संवर्ग चारमध्ये अर्ज केलेल्या महिला शिक्षकांचेही संवर्ग बदलेले आहेत. त्यामुळे ज्यांचे संवर्ग बदलले असतील, त्यांना पुन्हा संवर्ग बदलण्याची संधी मिळावी. तसेच ज्यांनी अर्ज केलेले नाहीत, त्यांनाही संधी द्यावी, अशा प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.

सकारात्मक निर्णयातून शिक्षकांना द्यावा दिलासा

जर या सर्व शिक्षकांना बदल करण्याची संधी न देता बदली प्रक्रिया राबविली तर व्हेरिफिकेशनवेळी शिक्षकांना अडचणी येतील आणि चुकीची माहिती भरली म्हणून त्यांच्यावर अधिकाऱ्यांकडून कारवाई होईल. त्यामुळे नवीन शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा तातडीने राबवून शिक्षकांना दिलासा द्यावा, असे शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gig Workers: गिग कामगारांसाठी दिलासादायक निर्णय! कर्ज देणारी नवी योजना जाहीर; वेळेवर कर्जफेड केल्यास क्रेडिट लिमिट वाढणार

Pune University News : पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६ निमित्त पुणे विद्यापीठाला सोमवारी सुटी!

Latest Marathi Live Update : सर्बियाच्या नोवी साद शहरात हजारो लोकांची निदर्शने

Ajanta Ellora Film Festival : विख्यात संगीतकार इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर!

जॉन अब्राहम–रोहित शेट्टीचा नवा अ‍ॅक्शनपट!

SCROLL FOR NEXT