Kanda Bajar Bhav sakal
महाराष्ट्र बातम्या

बळीराजाचे अश्रू सरकार पुसेल का? कांदा 1 ते 4 रुपये किलो; फेब्रुवारी-मार्चपेक्षाही सध्या बिकट स्थिती

सध्या शेतकऱ्यांना एक ते चार रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. फेब्रुवारीत सरासरी दर ९०० तर मार्चमध्ये ६०० रुपये होता. त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार आहे, पण एप्रिलमधील शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २९ दिवसांत सरासरी ५०० गाड्या कांद्याची आवक आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये कांद्याचे दर खूपच गडगडले आहेत. सध्या शेतकऱ्यांना एक ते चार रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. फेब्रुवारीत सरासरी दर ९०० तर मार्चमध्ये ६०० रुपये होता. त्या दोन महिन्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार आहे, पण एप्रिलमधील शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

अतिवृष्टीच्या संकटातून सावरणाऱ्या बळिराजाला कांदा पिकातून चांगले पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, कांद्याचे दर गडगडले आणि काही शेतकऱ्यांना पदरमोड करून रिकाम्या हाताने परतावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे (२०० क्विंटल मर्यादा) अनुदान देण्याचा मार्चअखेरीस निर्णय घेतला.

पण, अद्याप अर्ज स्वीकारण्याचीच प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर तालुका व जिल्हा स्तरावर अर्जांची छाननी तथा पडताळणी होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यांत विकलेल्या कांदा अनुदानासाठी अडीच ते तीन महिने वाट पाहावी लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात कांद्याचे दर खूपच कमी झाल्याने या काळातील शेतकऱ्यांनाही अनुदान द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

आता राज्य सरकार त्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे बळिराजाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या तेराशे गाड्या आल्या होत्या. त्यातील ९५ टक्के कांद्याला सरासरी १०० ते ४०० रुपयांचाच दर मिळाला आहे.

अनुदानासाठी ३७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यात सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या जवळपास ३७ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा लागवडीची नोंद नव्हती, त्यांना अर्ज करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कांद्याची नोंद केली जात आहे.

सोलापूर बाजार समितीतील स्थिती...

एप्रिलमधील अंदाजे आवक

  • ८,४७० गाड्या

  • सरासरी दर

  • १०० ते ४००

  • प्रतिकिलो कांदा

  • १ ते १२ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad चे खणखणीत शतक, अर्शीन कुलकर्णीचीही १४६ धावांची खेळी! पृथ्वी शॉ याला मात्र प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले?

Amit Shah: अमित शहांच्या वक्तव्यावर माजी न्यायाधीशांची टीका; ‘दुर्दैवी’ ठरवून सभ्य राजकीय प्रचाराची गरज अधोरेखित

Pune Crime: मांडवी, कुडजे, आगळंब्यात चोरीच्या घटनांत वाढ; पोलिस चौकी, गस्त नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

धैर्य, संघर्ष आणि संगीत प्रवासाची प्रेरणादायी कथा, ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Pakistan News: इम्रान खान अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत पाकिस्तानातील ७५ पीटीआय नेत्यांना तीन ते दहा वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT