महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: "कारवाई करणार का?"; दानवेंनी थेट सभागृहात सादर केला 'पेनड्राईव्ह'

किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओच्या विषयावरुन विरोधक आक्रमक

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या आणि भाजप नेते या व्हिडिओमुळे अडचणीत आलेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या कथित व्हि़डिओवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेत बोलताना आक्रमक झाले आहेत.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कि, 'काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केलं आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो.'

'माझ्याकडे सोमय्यांचे 8 तासांचे व्हिडिओ आहेत ते मी सभापतींकडे देणार आहे. असा हा भाजपचा नेता म्हणजे किरीट सोमय्या. माझ्याकडे या देशद्रोही नेत्यांच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? कि त्यांच्यावर कारवाई करणार' असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

तर माझे ईडीशी संबध आहेत असं सांगुन महिलांचे शोषण केलं जातं. तर अशा काही घटना माझ्यासमोर आल्या आहेत, असंही यावेळी बोलताना दानवे म्हणाले आहेत. तर या प्रकरणाचे माझ्याकडे काही व्हिडीओ आले आहेत असं म्हणत दानवेंनी ते व्हिडीओ असलेले पेन ड्राईव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिले आहे. तर या नेत्याला चांगल्या प्रकारची सुरक्षा आहे. ती काढुन त्यांच्यावर कारवाई करणार का? असं दावने म्हणालेत.

या प्रकरणात नाव समोर आलेल्या किरीट सोमय्या यांना सत्ताधारी संरक्षण देणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. तर दानवे यांनी पेन ड्राईव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिले आहे. तर सोमय्या यांना केलेल्या चौकशीच्या मागणीवर विचार करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संरक्षण असणाऱ्या नेत्यावर सरकार कारवाई करावी, असं दानवेंनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT