सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धाळीनाद आंदोलन करताना अंगणवाडी सेविका व मदतनीस. sakal
महाराष्ट्र बातम्या

अंगणवाड्यांमध्ये शिकवणार झेडपी शिक्षक? सेविका व मदतनीस कामबंद आंदोलनावर ठाम; २० दिवसानंतरही शासनाकडून तोडगा निघेना

तात्पुरता पर्याय म्हणून बचतगटांमार्फत चिमुकल्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. दुसरीकडे अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना सकाळी दोन तास जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शिकवावे, असा मार्ग काढला जात आहे, यासंबंधी हालचाली सुरु असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांसह राज्यभरातील एक लाख आठ हजार अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी ३ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. काम बंदमुळे चिमुकल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर तात्पुरता पर्याय म्हणून आता बचतगटांमार्फत किंवा शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून चिमुकल्यांना आहार दिला जाणार आहे. दुसरीकडे अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना सकाळी दोन तास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांनी शिकवावे, असा मार्ग काढला जात आहे, यासंबंधी हालचाली सुरु असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दोन लाखांपर्यंत तर राज्यभरात ६० लाखांपर्यंत चिमुकली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत (आईसीडीएस) अंगणवाड्या चालविण्यात येतात. ‘आईसीडीएस’अंतर्गत अंगणवाड्या या सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहेत. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधन नको वेतन द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

१९ दिवसानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही. भजन, ताटी-वाटी, खर्डा भाकरी अशा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत. पण, आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही शासन स्तरावर काहीही हालचाली सुरू नसल्याने अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांचे नुकसान होत आहे. त्यावर आता पर्याय शोधून चिमुकल्यांना पोषण आहार व अध्यापन केले जाणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून या पर्यायाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

बेमुदत संपामुळे चिमुकल्यांसाठी ‘असा’ पर्याय

  • - शालेय पोषण आहारासोबत अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना पोषण आहार देणे

  • - बचत गटांच्या माध्यमातून चिमुकल्यांना पोषण आहार देणे

  • - झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पहिली- दुसरीच्या शिक्षकांमार्फत चिमुकल्यांना दररोज दोन तास शिकवणे

अधिकाऱ्यांची बैठक, संघटनांसोबत पुन्हा चर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे चिमुकल्यांचे नुकसान होवू नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काय उपाय करता येईल, यासंदर्भात राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांसोबत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. त्यावेळी उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली, पण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी शासनाकडून पुढच्या आठवड्यात चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT