Nawab Malik: Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik: नवाब मलिक अधिवेशनात होणार सहभागी, शरद पवार की अजित पवार कोणत्या गटासोबत बसणार?

आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक देखील आज हजेरी लावणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक देखील आज हजेरी लावणार आहेत. नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान हिवाळी आधिवेशनावेळी नवाब मलिक अजित पवार गटासोबत बसणार की शरद पवार गटासोबत याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार आणि समर्थक आमदारांनी शिवसेना भाजपला पाठिंबा देत सत्तेत सामील झाले, त्यानंतर पक्षात दोन गट पडले. तेव्हापासून आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी आतापर्यंत घेतली होती. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे. कामकाजात सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणुन अद्याप दोन्हीं नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रित बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान नवाब मलिक कोणत्या गटासोबत बसणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मलिक अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातसुरू होत्या. मात्र, आतापर्यंत नवाब मलिकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे मलिक हे शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार या चर्चांना आज अधिवेशनात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT