Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2022 '५० खोके' संपले; आता 'दिल्लीचे मिंधे...'; विरोधकांची नवी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या आधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप कऱण्यात आले होते. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू आहे. यावरून विरोधकांनी निदर्शने करत नवीन घोषणा दिली आहे. (Winter Session 2022 news in Marathi)

याआधीच्या अधिवेशनात विरोधकांनी '५० खोके एकदम ओके', अशा घोषणा देत शिंदे गटातील आमदारांवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी या घोषणा गाजल्या होत्या. मात्र यावेळी विरोधकांनी नवीन घोषणा देत थेट एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं आहे. यावेळी जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यावेळी विरोधकांनी श्रीखंडाचे डब्बे विधानभवनाच्या आवारात वाटप केले. या डब्ब्यांवर भूखंड अर्थात 'भूखंडाचे श्रीखंड' अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. शिवाय 'दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे' अशी घोषणाबाजीही केली. एकंदरीत गेल्या वेळच्या घोषणा अजुनही गाजत असताना आता ही नवीन घोषणा थेट शिंदेंविरोधात देण्यात आली आहे.

हेही वाचा सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT