cm eknath shinde & dcm devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2022 : ''लोकशाहीच्या गप्पा मारणारे सभागृहात ४६ मिनिटं होते'' फडणवीसांनी काढले वाभाडे

संतोष कानडे

नागपूरः विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला अधिवेशनात मंजूर केलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी काय केलं ते सांगितलं.

यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकट्या विदर्भासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरुन निघेल. आम्ही लोकशाही मानणारी लोकं आहोत. त्यामुळे सभागृहात पूर्णवेळ थांबून कामं केली. परंतु जे लोकशाहीच्या नावाने आवई उठवतात ते केवळ ४६ मिनिटं सभागृहात होते.

हेही वाचाः जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली. त्यांनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर प्रकल्पांबाबत माहिती दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार बदललं नसतं तर यावर्षीही अधिवेशन झालं नसतं. कारण तिकडे चीन, जपानमध्ये कोरोना आलेला आहे... असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.

''विदर्भातले सिंचनाचे, रस्त्याचे, प्रकल्पांचे प्रश्न या अधिवेशनामध्ये सोडवले. त्यामुळे विदर्भात ४५ हजार लोकांना रोजगार आणि ७० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. आम्ही राज्याचं खनिज धोरण राबविण्याचा निर्णय घेतलाय'' अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Students Food Poison : पुण्यात एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप

Mumbai Pollution: अत्‍याधुनिक वाहने धूळ रोखणार, अनुभवी अभियांत्रिकी संस्था, कंपन्यांकडून मागवले अर्ज

Latest Marathi News Live Update : मनमाडमध्ये आजपासून उत्तर महाराष्ट्राचे पहिल्या विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Mumbai Vanrani: नॅशनल पार्कमधील वनराणीला पसंती, महिनाभरात ९,००० जणांची भेट; ७.५० लाखांचे उत्पन्न 

Pune District Politics: भोरमध्ये दांपत्य प्रथमच एकाच वेळी सदस्य; राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड जिल्हा परिषदेला, तर तृप्ती खुटवड पंचायत समितीला विजयी!

SCROLL FOR NEXT