Devendra Fadnavis News | Uddhav Thackeray News esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'मविआ' सरकार फडणवीसांना तुरुंगात टाकणार होतं ; सभागृहात गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पहायला मिळालं.

आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एक गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून आमच्या अनेक आमदारांना त्रास दिला जात होता. मलाही तुरुंगात टाकण्याचा प्लान आखल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचाः जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

ते पुढे म्हणाले की, मला जेलमध्ये टाकण्यासाठी तयारी झाली होती. संजय पांडे यांना याबाबत जबाबदारी दिली होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे कंगना रणौत हिचं घर पाडण्यासाठी ८० लाख वकिलाला दिल्याचं त्यांनी सांगितलं.

'हे आमच्या मंत्र्यांवर आरोप लावतात आणि राजीनामा मागतात. यांचे मंत्री जेलमध्ये गेले तरी राजीनामा घेतला नाही. मुख्यमंत्र्यांवर आरोप करुन तुम्ही तोंडावर पडलात' असंही फडणवीस म्हणाले.

रेशीमबाग भेटीवरुन राजकारण- सीएम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही रेशीमबाग येथे भेट दिली, त्यावरून राजकारण केलं गेलं. मला रेशीमकिडा म्हटलं गेलं. पण मी सांगू इच्छितो की, मी रेशीमबागेत गेलो, तुमच्यासारखा गोविंदबागेत नाही. आम्हाला म्हणतात, बाप चोरला. अहो, बाळासाहेब आमच्यासाठी पितृतुल्यच आहेत. जन्म दिला नसला तरी त्यांनीच आम्हाला घडवलं. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रतारणा आम्ही कधीही केली नाही, असंही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेसाठी बाळासाहेबांचे विचार संपविण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी बाळासाहेबांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले. बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले. शिंदे पुढं म्हणाले की, खुर्चीसाठी तुम्ही पाप केलं. एक म्हण आहे, 'हिऱ्यापोटी गारगोटी..', असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता जहरी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT