Ajit Pawar News  esakal
महाराष्ट्र बातम्या

''मी दहावेळा अर्थसंकल्प मांडला; इकडून मांडला की तिकडचे टीका करतात अन् तिकडून मांडला की इकडचे टीका करतात'', अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar News : महाविकास आघाडी असो की महायुती असो.. दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात अन् तिकडनं मांडला की इकडचे टीका करतात.. त्यामुळे त्या टीकांमध्ये काही तथ्य नाही.

संतोष कानडे

Maharashtra Budget 2024 : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने बजेटमध्ये तरतुदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या बजेटमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती लाडकी बहीण योजनेची.

लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचं वीज बील माफ यासह इतर मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. शुक्रवारी सभागृहामध्ये बोलताना अर्थमंत्री अजित यांनी एक मजेशीर मुद्दा मांडला. जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते.

अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्पामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.. जयंतरावांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आणि मी दहा वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे थोडाबहुत अनुभव मला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडी असो की महायुती असो.. दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात अन् तिकडनं मांडला की इकडचे टीका करतात.. त्यामुळे त्या टीकांमध्ये काही तथ्य नाही.

''बजेटमध्ये दरवर्षी ३०-३५ हजार कोटींची ‌वाढ होतेय, केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे.'' असंही अजित पवार म्हणाले. यावेळी भास्कर जाधवांनी मध्येच म्हटलं की, दादा तुम्ही भाषण करताय पण भाजप, शिंदेंचे मंत्री कुठेत? त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्यावर बाकीच्यांचा इतका डोळे झाकून विश्वास आहे की मला एकट्यालाच उत्तर द्यायला सांगितलं.. बाकी पण महत्त्वाची कामं असतात, राज्य झपाट्यानं पुढं जात आहे भास्करराव... असं म्हणत अजित पवारांनी उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT