Winter session costs 28 lakhs on five cottages and 12 suites nagpur politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Winter session : दुरुस्तीचा खर्च चक्रावणारा; पाच कॉटेज, १२ सुटवर २८ लाख

हिवाळी अधिवेशन काळात रविभवन येथील पाच मंत्री कॉटेज व १२ सुटच्या देखभाल दुरुस्तीवर २८ लाखांवर खर्च करण्यात आला.

नीलेश डोये

नागपूर : हिवाळी अधिवेशन काळात रविभवन येथील पाच मंत्री कॉटेज व १२ सुटच्या देखभाल दुरुस्तीवर २८ लाखांवर खर्च करण्यात आला. वर्षभर पाहुण्यांची वर्दळ नसतानाही एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२२ मध्ये दोन वर्षानंतर नागपुरात झाले. त्यापूर्वीचे अधिवेशन ऐनवेळी मुंबईला घेण्यात आले. त्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते.

२०२२ च्या अधिवेशनातून प्रत्यक्ष विदर्भ व महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले, हा चर्चेचा भाग आहे. परंतु या अधिवेशनासाठी शेकडो कोटी खर्च झाल्याचे निदर्शनास येत आहे. बांधकाम विभागाकडून ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. कंत्राटदारांकडून कमी दराच्या निविदा सादर केल्याने ६५ कोटींच्या वर खर्च झाल्याची माहिती आहे. बांधकाम विभागाचा आराखडा आणि कामावर करण्यात आलेला खर्च वादात सापडण्याची शक्यता आहे.

इस्टिमेट आणि कामात तफावत

प्रत्यक्षात विभागाकडून तयार करण्यात आलेले इस्टिमेट आणि कंत्राटदारांकडून करून घेण्यात आलेले काम यात बरीच तफावत आहे. यातील काही कामांवर लक्ष दिल्यावर अनेकांच्या भुवयाच उंचावल्या. रविभवन येथील ५ मंत्री कॉटेजच्या देखभाल दुरुस्तीवर १५ लाख ६१ हजार तर १२ सुटच्या देखभाल दुरुस्तीवर १२ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात आले. आयुक्त कार्यालय व प्रशासकीय इमारत १ व २ येथील पाणी टाकी परिसरातील सफाई व इतर किरकोळ कामांवर १० लाख १० हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सुदर्शन गोडघाटे यांना माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून पुढे आले..

असा आहे खर्च

रविभवनमधील १२ सुट दुरुस्ती

अंदाज

२० लाख ७५ हजार १३८ रुपये

प्रत्यक्ष खर्च

१२ लाख ६६ हजार ०४१

सफाई, दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे

अंदाज

१६ लाख ८७ हजार ३९४

प्रत्यक्ष खर्च

१० लाख १० हजार ५८०

५ मंत्री कॉटेज दुरुस्ती

अंदाज

२४ लाख ५८ हजार ८२० रुपये

प्रत्यक्ष खर्च

१५ लाख ६१ हजार १०४ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prices in Kolhapur : ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात तेजी सुरूच; एका दिवसात 'इतक्या' हजारांनी वाढला दर, आणखी वाढ होण्याची शक्यता!

Latest Marathi News Live Update: पुण्यात पुन्हा बिबट्या? बावधन खुर्दमध्ये बिबट्याचं दर्शन

Leopard Attack : काळजात धस्स! अचानक बिबट्या समोर आल्यास घाबरू नका, 'हे' शास्त्रशुद्ध उपाय करा

Team India: मोठा ट्वीस्ट येणार? BCCI ने दुसऱ्या वनडेआधी बोलावली मिटिंग, गंभीर-आगरकरही राहणार उपस्थित

Varanasi News : वाराणसीत लखनऊ महामार्गावर सिक्स-लेन बोगद्याचे बांधकाम सुरू; खालून गाड्या, तर वरून धावणार विमान!

SCROLL FOR NEXT