हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन
महाराष्ट्र बातम्या

हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच? आघाडीला आमदार फुटण्याची भीती

राजेश चरपे

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनापाठोपाठ नागपूरमध्ये होऊ घातलेले हिवाळी अधिवेशन विधानसभा अध्यक्षांविनाच होणार आहे. महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती असल्याने गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदानाचा कायदा विधान परिषदेत आधी पारित केला जाणार असल्याचे समजते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून नवे अध्यक्ष कोण याची चर्चा आहे. मध्यंतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, काँग्रेसने जागा वाटपाच्या ठरलेल्या सूत्राकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यात पटोले यांनी आम्हाला जशी सत्तेची गरज आहे तशी शिवसेना-राष्ट्रवादीलाही आहे असे स्फोटक विधान करून एक प्रकारे आपल्याच सहकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यानंतर अध्यक्ष काँग्रेसचाच होईल अशी नरमाईची भूमिका आघाडीतील इतर दोन पक्षांनी घेतली.

मध्यंतरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तत्काळ अध्यक्ष नेमण्याची सूचना केली होती. त्यावर आघाडीतील प्रमुख नेते आणि राज्यपालांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. नवे सरकार येण्यापूर्वी अध्यक्ष नेमण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. आता तो सत्ताधाऱ्यांचा आहे, असेही ठणकावून सांगण्यात आले होते.

तत्पूर्वी, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. त्या बदल्यात ऊर्जा खाते नाना पटोले यांना दिले जाणार असल्याची जोरदार चर्चाही काँग्रेसमध्ये होती. मात्र, दिल्लीश्वरांनी अद्याप यास हिरवी झेंडी दिली नाही. त्यामुळे हा विषय थांबला. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अध्यक्षांच्या नावाची पुन्हा चर्चा रंगणार आहे.

आघाडीत धुसफुस सुरू

आघाडीत मोठ्या प्रमाणात धुसफुस सुरू आहे. त्यात भाजपच्यावतीने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहे. अशा स्फोटक परिस्थितीत अध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर काहीही घडू शकते अशी भीती आघाडी सरकारला आहे. अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घेण्यात येते. त्याऐवजी हात उंचावून मतदान घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आधी कायदा करावा लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेण्यात येईल असे काँग्रेसच्या नेत्याचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT