crimes against women  Sakal
महाराष्ट्र बातम्या

महिला अत्याचारासंबंधीचं 'शक्ती कायदा' विधेयक बहुमतानं मंजूर

विरोधकांचाही विधेयकाला पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बालकं आणि महिलांवरील अत्यारांविरोधात (Women Violence) कठोर कायदा आणावा अशी मागणी सातत्यानं होत होती. त्या अनुषंगानं तयार करण्यात आलेला 'शक्ती कायदा' (Shakti Act) विधेयक आज हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलं. हे विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) विधेयक मंजूर झाल्याचं विधानसभेत सांगितलं. (Winter Session Shakti Act Bill on Violence Against Women Approved with Majority)

सामुहिक बलात्कार, अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूदीचा यामध्ये करण्यात आली आहे. यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना देखील करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर कठोर शिक्षेची तरतूद असलेला हा कायदा आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची घोषणा केली होती. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आलं होतं.

शक्ती कायद्यात आहेत 'या' कठोर तरतुदी

शक्ती कायद्यांतर्गत सामुहिक बलात्कार, अॅसिड हल्ला, विनयभंग तसेच सोशल मीडियातून महिलांची बदनामी असे गुन्हे अजामिनपात्र असणार आहेत. त्याचबरोबर या कायद्यासाठी खास फास्टट्रॅक कोर्टांची निर्मिती करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा असेल. याद्वारे गुन्हा घडल्याच्या महिन्याभरात महिला अत्याचारांचे गंभीर गुन्हे निकाली काढण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT