Winter Session 
महाराष्ट्र बातम्या

Winter Session: हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसात गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक जाहीर!

Sandip Kapde

Winter Session: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. नागपूर येथे हे अधिवेशेन होणार आहे.

7 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे 20 डिसेंबर पर्यंतचे कामकाज दिनदर्शिकेत नमूद करण्यात आले आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवस कामकाज होणार असून त्या पुढे कामकाज चालणार आहे की अधिवेशन 20 डिसेंबरला गुंडाळलं जाणार आहे, हे विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

दरम्यान दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते मात्र या वर्षी तो 20 डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अधिवेशनात मराठा आरक्षण, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करणार आहेत. राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, तसेच नुकसान भरपाईबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT