महाराष्ट्र बातम्या

RT-PCR असेल तरच कर्नाटकात प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

यावेळी तपासणी नाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या

अनिल पाटील

कोगनोळी : महाराष्ट्रातील (maharashtra) कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटी-पीसीआर रिपोर्ट (RT-PRC report) किंवा कोरोना प्रतिबंधक लस (covid-19 vaccine) घेतल्याचा दाखला असल्याशिवाय कर्नाटकात (karnatak) प्रवेश दिला जाणार नाही. बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात 3.2 टक्के रुग्ण प्रमाण आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घरातून बाहेर पडून नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. येथील राष्ट्रीय महामार्गावरील (MH 04) कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला त्यांनी शनिवारी (26) भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी तपासणी नाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या. नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी चिक्कोडीचे प्रांताधिकारी युकेशकुमार, निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही.शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरण्णावर, निपाणीचे सर्कल अजित वंजोळे, कोगनोळीचे तलाठी के. एल. पुजारी, एएसआय एस. ए. टोलगी, विजय पाटील, एस. आय. कुभार यांच्यासह अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT