pagare esakal
महाराष्ट्र बातम्या

'आर्यनला अडकवण्याचा कट, गोसावीने 50 लाख ॲडव्हान्सही घेतले'

या प्रकरणात साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणात साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण हे घडवून आणलं गेलं आहे असा धक्कादायक दावा साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे हे प्रकरण अजून वेगळे घेणार का ? यावर चर्चा रंगल्या आहेत.

याप्रकरणी साक्षीदार विजय पगारे यांना काही खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, किरण गोसावीने यांनी 50 लाख रुपये ॲडव्हान्सही घेतले होते. संपूर्ण डिलमधील काही रक्कम अधिकाऱ्यांना जाणार होती. यासंबंधी सुनील पाटील मला स्वतः बोलला होता, असा खळबळजनक खुलासा पगारे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सुनील पाटील याचं समीर वानखेडे यांच्याशी सतत व्हॉईस कॉलवर बोलणं होत होतं. माझ्यासमोर हे बोलणं सुरु आहे. जर तपास अधिकारी यांनी मनीष भानुशाली आणि सुनील पाटील यांची योग्य प्रकारे तपासणी केली तर सगळं प्रकरण बाहेर येईल. माझं स्पष्ट म्हणणं आहे आर्यन खानला फसवण्यात आलं आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या गौप्यस्फोटानंतर आता पगारे यांना धमक्या येऊ लागल्याने त्यांनी सरकारकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. सुनील पाटील यांच्याकडून मला आणि माझ्या परिवाराला धोका आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने कुटुंबाला आणि स्वतः मला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT