Ransom Demand To Dhananjay Munde E Sakal
महाराष्ट्र बातम्या

धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवणारी 'ती' महिला अटकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एका महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना दिली. तसेच त्यांच्या ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही महिला इंदूरची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात (Mumbai Police) महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील रेणू शर्मा या महिलेला इंदूर येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिस रेणू शर्माला मुंबईत दाखल करणार आहेत.

आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली. तसेच त्यांना ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. ५ कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मुंडेंकडे लावला. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय रेणू शर्माने खोटी कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करून बदनामी करून त्यांच्या मंत्रीपद घालण्याचा धमकी त्याने दिली होती. तसं करायचा नसेल तर पाच कोटीचे घर आणि पाच कोटींची कंपना द्या, अशी मागणीही तिने केली होती. आरोपी महिलेविरोधात पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT