Ladki Bahin Yojana Fraud  Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारून महिलांचे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज; लाभ वेळेत मिळत नाही, वाढीव लाभही नाही, वाचा...

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरवातीला अर्ज केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला गेला, पण अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने अपात्र लाभार्थींच्या शोधासाठी निकषांच्याआधारे पडताळणी सुरू केली. त्यात सद्य:स्थितीत दहा लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ पर्यंत वेळेवर लाभ मिळाला, पण सहा महिन्यांपासून लाभ वेळेत मिळत नाही. जूनचा लाभ अजून मिळालेला नाही. तत्पूर्वी, योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत राज्यातील दहा लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ५३ महिलांनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा, अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावर केल्याची बाब समोर आली आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरवातीला अर्ज केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला गेला, पण अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने अपात्र लाभार्थींच्या शोधासाठी निकषांच्याआधारे पडताळणी सुरू केली. त्यात सद्य:स्थितीत दहा लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. आता आयकर विभागाकडून माहिती मागविण्यात आली असून माहिती प्राप्त होताच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचेही लाभ बंद होणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांना आपला लाभ सुरू राहील की बंद होईल, अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. दुसरीकडे नव्याने पात्र झालेल्या महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे २०२५ पर्यंतचा लाभ महिलांना मिळाला असून जून महिन्याचा लाभ लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होईल. सोलापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी विविध कारणास्तव लाभ नाकारला आहे. काहींनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करा म्हणूनही अर्ज केले आहेत.

- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

लाभ बंद करा म्हणण्यामागील कारणे...

  • निकषांच्या आधारे पडताळणीत अपात्र होण्याची भीती

  • अपात्र ठरल्यावर पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होण्याची भीती

  • दीड हजार रुपयांच्या लाभात वाढ होण्याची आशा मावळली

  • दरमहा २५ तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा, पण वेळेत मिळत नाही लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''आम्हाला बहीण-भाऊ म्हणू नका'', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? राजकीय संकेत काय?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Latest Marathi News Live Update : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Ajit Pawar : 'मिनी भारत' ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आवाहन

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

SCROLL FOR NEXT