Family-Planning 
महाराष्ट्र बातम्या

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत राज्यात महिलाच आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलाच पुढाकार जास्त घेत असल्याचे अधोरेखित झाले आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी २० हजार महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया होते. त्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात मुंबईत केवळ १००२ पुरुषांची नसबंदी झाली आहे. विशेष म्हणजे काळबादेवी, डोंगरी आणि बोरिवली परिसरात नसबंदीची एकही शस्त्रक्रिया झाली नाही.

समाजामध्ये महिलांनीच कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करावी, अशी मानसिकता असल्याने महिलांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, पुरुषांच्या नसबंदीबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक पुरुष या शस्त्रक्रियेसाठी तयार होत नाहीत. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत असले, तरीही महिलांच्या तुलनेने हे प्रमाण मात्र अत्यंत नगण्य आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात तीन लाख २८ हजार ६६ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाली. त्या तुलनेत केवळ नऊ हजार ७३९ पुरुषांची नसबंदी झाली.

दोन वर्षांत २५ टक्के प्रमाण वाढले
पुरुषांनी कुटुंबनियोजनाची जबाबदारी स्वीकारण्याचे प्रमाण महिलांपेक्षा कमी असले, तरी गेल्या दोन वर्षांत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. २०१६-१७ मध्ये ७२५, २०१७-१८ मध्ये ९१४; तर २०१८-१९ मध्ये १००२ पुरुषांवर शस्त्रक्रिया झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT