government scheme ladaki bahin

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

चारचाकी वाहन, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त, २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांवरील महिला, तसेच केंद्र व राज्याच्या वैयक्तिक योजनांच्या लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत. याशिवाय, एकाच कुटुंबातील विवाहित व एक अविवाहित मुलगी (२१ वर्षांवरील) योजनेचा लाभ घेऊ शकते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ५६३ महिलांनी एक वर्षभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. दरमहा त्यांना राज्य शासनाकडून १६९ कोटी ५८ लाख ४४ हजार ५०० रुपये मिळाले. मात्र, निकषांच्या पडताळणीत आता निम्म्या महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आता ९० कोटी रुपयेच लागतील. तरीदेखील, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर २०२५ पासून दरमहा १५०० रुपये वेळेवर मिळालेले नाहीत. त्यावर अधिकारी मंत्रालयाकडे बोट दाखवत आहेत. राज्यातील तब्बल ८१ लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.

चारचाकी वाहन, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त, २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांवरील महिला, तसेच केंद्र व राज्याच्या वैयक्तिक योजनांच्या लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत. याशिवाय, एकाच कुटुंबातील विवाहित व एक अविवाहित मुलगी (२१ वर्षांवरील) योजनेचा लाभ घेऊ शकते. मात्र, निकष पायदळी तुडवून सरकार सगळ्यांनाच लाभ देणार असल्याने अपात्र महिलांनीदेखील अर्ज केले. सर्वांना १२ ते १४ महिने लाभही मिळाला.

एक वर्षानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी झाली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पाच लाखांपर्यंत महिला अपात्र ठरल्या. काहींना ई-केवायसी करूनही लाभ मिळत नाही. त्या महिला आता थेट जिल्ह्याचे महिला व बालविकास कार्यालय गाठून जाब विचारत आहेत. मात्र, तेथील अधिकारी अपात्र होण्याचे कारण सांगतात; पण दरमहा १५०० रुपये पुढे कायम मिळतील का, या प्रश्नावर अधिकारी थेट मंत्रालयाकडे बोट दाखवतात.

महिलांचे दररोज हेलपाटे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच आता योजनेचा लाभ मिळणार आहे. अनेक महिलांना लाभ बंद झाल्याचे समजत नाही. काहींना मागील काही महिन्यांचा लाभ मिळालेला नाही. अशा महिला आमच्या कार्यालयात दररोज ये-जा करीत आहेत.

- अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

नवीन लाभार्थींची नोंदणी बंदच

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय २८ जून २०२४ रोजी झाला. निकषांनुसार, योजनेच्या लाभासाठी महिला किंवा तरुणीचे वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत असावे, अशी अट घालण्यात आली. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ पर्यंत पात्र महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. मात्र, योजना सुरू झाली तेव्हा १९, २० वर्षांच्या असलेल्या तरुणी व महिला आता २१ वर्षांच्या झाल्या आहेत. निकषांनुसार त्या महिला पात्रदेखील आहेत, परंतु त्यांना अर्ज करण्याची संधीच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT