Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा"; उद्धव ठाकरेंचं महिला दिनी आवाहन

भारतमातेचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

धाराशिव : महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा, असं आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. धाराशिव इथं एका सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गानं भारतमातेचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत असं आवाहनही त्यांनी केलं. (women power should end dictator in country uddhav thackeray appeal from dharashiv)

उद्धव ठाकरे म्हणाले, "महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं हे कळत नाहीए. कारण कोणत्या देशात आपण राहतो इथली राजवट कशी आहे. महाराष्ट्रात काय सुरु आहे. मेरा परिवार असं मोदींनी जाहीर केलं. मग मणिपूरच्या महिला यात येत नाहीत का? तसेच आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू यामध्ये येत नाहीत का? अशी महिलांची हालत बघितल्यानंतर त्यांना शुभेच्छा तरी कशा देऊ" (Marathi Tajya Batmya)

धाराशिवमध्ये येऊन काल मी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं त्या तुळजाभवानीचं तुम्ही रुप आहात. तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला आसूर माजले त्यावेळी जगदंबेनं अवतार घेतले होते म्हणून आपण तिला महिषासूर मर्दिनी म्हणतो. (Latest Marathi News)

म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशात जो हुकुमशहा माजू पाहतोय त्याचं मर्दन करुन पुन्हा एकदा भारत मातेचं रक्षण करण्यासाठी देशातील सर्व महिलांना आम्ही विनंती करतो, वंदन करतो आणि पुढच्या लढाईच्या यशासाठी आशीर्वाद मागतो. ही लढाई मोठी आहे कुठेही फसू नका? अडकू नका. विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT