gold chain theft sakal
महाराष्ट्र बातम्या

महिलांनो, सणासुदीत दागिने सांभाळा, अन्यथा..! रस्त्यांवरून जाताना, बाजारपेठेत काय घ्यावी खबरदारी? चोरटे काय शक्कल लढवतात, वाचा...

दिवाळीच्या निमित्ताने महिला अंगावर दागिने घालून माहेरी जातात. वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये येतात. या काळात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी चेन स्नॅचिंग घटनांचा व्हिडिओ तयार करून महिलांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीच्या निमित्ताने महिला अंगावर दागिने घालून माहेरी जातात. वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये येतात. या काळात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी चेन स्नॅचिंग घटनांचा व्हिडिओ तयार करून महिलांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

चेन स्नॅचिंग करणारे दुचाकीवरून जाणाऱ्या महिला, रस्त्यावरून वॉकिंग करणाऱ्या महिला, खरेदीसाठी ये-जा करणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवतात. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून वर्दळ नसलेल्या ठिकाणी चोरटे महिलांना गाठतात. त्यांना काही समजण्यापूर्वीच गळ्यात हात घालून दागिन्यांना हिसका मारून दुचाकीवरून पसार होतात. ज्येष्ठ महिलांचा पाठलाग करून दागिने हिसकावतात. अनेकदा महिला तोंडावर आपटून जखमीदेखील झाल्या आहेत.

सणासुदीत पोलिस गस्त वाढवितात. साध्या वेशातील देखील पोलिस चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून रस्त्यावर गस्त घालतात. पण, शहराचा विस्तार, असंख्य छोटे-मोठे रस्ते, रस्त्यांवरील वर्दळ या बाबींचा विचार करता पोलिसांचे मनुष्यबळ अपुरेच पडते. त्यामुळे महिलांनी खबरदारी घेणे हाच चेन स्नॅचिंगचे प्रकार रोखण्याचा उत्तम उपाय असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

महिलांनी खबरदारी घ्यायला हवी

दिवाळीसह अन्य सण-उत्सवात शहरात महिलांची मोठी गर्दी राहाते. अशावेळी सगळीकडेच चेन स्नॅचिंगचे प्रकार घडतात. त्यामुळे महिलांनी अंगावरील दागिने सांभाळावेत. रस्त्यावरून जात असताना अनोळखी कोणी आपला पाठलाग करत नाही ना, अनोळखी दुचाकीस्वार जवळ येत नाही ना, याची खात्री करावी, जेणेकरून चोरीच्या घटना होणार नाहीत.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

चोरट्यांची शक्कल लक्षात ठेवाच...

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांजवळ जाऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला जातो. मागून अचानक येऊन दुचाकीवरील मागचा व्यक्ती दागिने हिसकावतो. दुचाकी आडोशाला लावून दुसरा तरुण महिलेचा पाठलाग करतो आणि वर्दळ नसलेल्या ठिकाणी गाठून गळ्यातील दागिने हिसकावतो. त्यामुळे चोरट्यांच्या या शक्कल महिलांनी लक्षात ठेवून खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort Illegal Hotels : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे; रोप -वे कंपनीचे अतिक्रमण, संभाजीराजेंचा घणाघात, "पुरातत्व विभागाकडून पाठबळ"

बिबट्यांना 'जन्मठेप', बालकांचा बळी घेणाऱ्या ४ बिबट्यांबाबत वनविभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Winter Session : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, उपराजधानीत घातपाताची शक्यता; पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर

Indigo Plane : ‘इंडिगो’चे विमान ‘पार्किंग बे’वरच! रविवारी ५० विमाने रद्द

आजचे राशिभविष्य - 08 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT