Marathi Bhasha Gaurav Din esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Bhasha Gaurav Din : पालकांचा वाढता इंग्रजीचा कल मराठी भाषेला गिळंकृत तर करणार नाही ना?

पण वाढत्या इंग्रजीच्या गरजेमध्ये आपली लाडकी मराठी उरणार आहे का? ...

सकाळ डिजिटल टीम

Marathi Bhasha Gaurav Din : आज मराठी भाषा गौरव दिन, कवी वि. वा. शिरवडकर किंवा कुसुमाग्रज यांच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी त्यांचा जन्मदिवस अर्थात "२७ फेब्रुवारी" हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.

आज सारेच खूप जल्लोषात हा उत्सव साजरा करतात, पण वाढत्या इंग्रजीच्या गरजेमध्ये आपली लाडकी मराठी उरणार आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सध्याच जग हे टेक्नॉलजीच झालं आहे, आपण एकाठिकाणी बसून जगाच्या दुसऱ्या टोकाला कनेक्ट करू शकतो.

अशात वाढती स्पर्धा थेट जागतिक होऊन बसली आहे आणि यात सर्वात जास्त धोका आहे तो तरुण पिढीला आणि लहान मुलांना, कारण स्पर्धा दिवसेंदिवस वाढते आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वात महत्वाची झाली आहे इंग्रजी भाषा.

एकेकाळी फक्त कॉमन लॅंगवेज म्हणून ओळखली जाणारी इंग्रजी आता घराघरात जाऊन पोहोचली आहे, अगदी अशिक्षित व्यक्तीही नकळतपणे इंग्रजी भाषेचे काही शब्द बोलून जातो. धावत्या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी उत्तम शिक्षणासोबत उत्तम इंग्रजी येणे गरजेचे आहे.

मराठी शाळांमध्ये इंग्रजी भाषा शिकवली जात नाही का?

मराठी माध्यमांच्या शाळेंमध्ये इंग्रजी भाषा शिकवली जाते, पण फक्त एका तासापुरती शिकलेली भाषा बोलणे प्रत्येकाला शक्य नाही शिवाय मराठी माध्यमाच्या शाळेत सर्वच मराठीत बोलतात आणि यासगळ्यात इंग्रजी भाषा ही अगदीच नवखी असल्याने त्यांच्या मनात इंग्रजीबद्दल भीती निर्माण होते आणि ते भाषा शिकायला नकारही देतात.

इंग्रजी खरंच इतकी महत्वाची आहे?

बहुदा काही प्रमाणात सरकारी नोकरीचे क्षेत्र सोडले तर साऱ्या क्षेत्रात इंग्रजी फार महत्वाची झाली आहे, शिवाय सगळ्याच गोष्टी आता कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करणे सुरू झाल्याने इंग्रजी फार महत्वाची आहे, वाढत्या स्पर्धेत संवादासाठी इंग्रजी हा एकच पर्याय उरला आहे यात काही शंका नाही.

मुलांना मराठीची गोडी कशी लावावी?

- मुलांना मराठीची गोडी लावणे कठीण नाही, काही लोकं घरातही मराठी बोलणं टाळतात असं करणं आधी बंद करा.

- इंग्रजी भाषा गरजेची आहेच पण मुलांना मराठी साहित्याचीही गोडी लावा.

- मराठीत मुलांसाठी असे अनेक चित्रपट आणि नाटकं आहेत ज्यानेही त्यांना मराठीची गोडी लागू शकते.

- आपल्या मुलांना घेऊन वेगवेगळ्या ट्रेकला जा तिथल्या गोष्टींबद्दल ठिकाणांबद्दल त्याच्या इतिहासाला त्यांना सांगा.

- इंग्रजीच्या वापरासोबत घरात मराठीचाही वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT