Devendra Fadanvis  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis : डीपीसीमधील कामांचे भवितव्य नवीन पालकमंत्री फडणवीस यांच्या हाती

सकाळ डिजिटल टीम

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे आता स्थगिती असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. (work in dpc is in the hands of the new guardian minister fadnavis )

नवीन पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्याने २१४ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेतील कामे सुद्धा मार्गी लागणार आहेत. राज्य शासनाकडून विविध विकास कामांसह उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समितीला निधी मंजूर करण्यात येतो. या निधीच्या वितरणाचे नियोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) करण्यात येते.

नवीन सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील कामांना स्थगिती दिली होती. त्यामध्ये डीपीसीतून करण्यात आलेल्या विकास कामांचा सुद्धा समावेश होता. दरम्यान सदर कामे पुढे सुरू ठेवायची की नाहीत किंवा कसे, याबाबतचा निर्णय नवनियुक्त पालकमंत्र्यांच्या सहमतीने घ्यावा, अशा आशयाचे पत्र शासनाच्या नियोजन विभागाने जारी केले होते. त्यामुळे आता नवीन पालकमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT