World Book Day sakal
महाराष्ट्र बातम्या

World Book Day : सकाळ प्रकाशनातर्फे ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ स्पर्धा

‘जागतिक पुस्तक दिन साजरा करा, तुमच्या पुस्तकसंग्रहाबरोबर’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘जागतिक पुस्तक दिनानिमित्त’ (ता. २३ एप्रिल) ‘सकाळ प्रकाशनाने’ वाचकांचे पुस्तकांबद्दलचे, वाचनाचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. यातून वाचकांना त्यांचे पुस्तकांबरोबरचे भावनिक उलगडून दाखविण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.

वाचन हा दिनचर्येचा एक भाग असलेले जाणकार किंवा नवोदित वाचक, तसेच पुस्तकांवर, वाचनावर प्रेम करणाऱ्या कोणालाही या स्पर्धेत सहभागी होता येईल. यासाठी वाचकांनी त्यांचा वैयक्तिक पुस्तक संग्रह किंवा गृहरचना सोसायट्यांतील ग्रंथालयाबरोबरचा एक सेल्फी आम्हाला पाठवायचा आहे.

हा सेल्फी काढताना तुम्ही तुमचा पुस्तक संग्रह कल्पकतेने कसा सजवता, त्यात एखादा बेस्टसेलरचा कप्पा, गाजलेल्या अभिजात कथा-कादंबऱ्यांचा संग्रह, जमवलेली दुर्मिळ पुस्तके यांचा समावेश असावा. जमवलेल्या पुस्तकांशी, पुस्तक संग्रहाशी, तुमच्या ग्रंथालयाशी संबंधित खास अशी एक गोष्ट या सेल्फीसह सांगायची आहे.

Sakal Prakashan

सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवर दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे हा सेल्फी आणि ही गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे. सोबत तुमच्या पुस्तक संग्रहाचे, ग्रंथालयाचे वैशिष्ट्य काय? कोणती कोणती पुस्तके त्यात आहेत, हेही आवर्जून लिहा. या स्पर्धेसाठी सेल्फी २२ एप्रिलपर्यंत पाठविता येतील. तर, २३ एप्रिल रोजी ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांची नावे घोषित केली जातील.

याच दिवशी सकाळ माध्यम समूहाच्या ऑनलाइन आणि प्रिंट प्लॅटफॉर्मवरून घराघरांत असलेल्या अनोख्या पुस्तक संग्रहाचे विविधांगी विश्वही वाचकांना अनुभवता येईल. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २७ एप्रिल रोजी म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित लॉन्स येथे होणार आहे.

तुम्ही वाचक, पुस्तक संग्रही, गोष्ट सादर करणारे कलाकार अथवा या प्रकारे वाचनाशी संबंधित कोणतीही आवड जोपासणारे असाल, तर ती आवड आमच्यासोबत नक्की शेअर करा. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि संवर्धनासाठी या स्पर्धेत वाचकांनी आवर्जुन सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ प्रकाशना’तर्फे करण्यात आले आहे. ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ स्पर्धेची वैशिष्टे

- सेल्फी : वैयक्तिक पुस्तक संग्रह किंवा सोसायटीच्या ग्रंथालया सोबतचा

- सेल्फी पाठविण्याची मुदत - २२ एप्रिल

- विजेत्यांची नावे घोषित होणार - २३ एप्रिल

- स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ - २७ एप्रिल

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा आणि आपला फोटो अपलोड करा तसेच फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करा आणि @sakalprakashan ला टॅग करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT