महाराष्ट्र

मधमाश्यांनाही आवडतं आईसक्रीम? त्यांचं आइसक्रीम नक्की कोणतंय? जाणून घ्या

अथर्व महांकाळ

नागपूर : असं म्हणतात पर्यावरणात इतके गूढ लपलेले आहेत की ते जाणून घेण्यासाठी शेकडो वर्षही कमी पडतील. निसर्गात (Nature News) अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला माहिती नाहीत. वनस्पती, फुलं, फळं, झाडं , कीटक, पशु-पक्षी हे निसर्गानं मानवजातीला दिलेले अमूल्य घटक आहेत. याच निसर्गात काही आश्चर्यही असतात. आता मधमाश्यांपासून (World Honeybees Day) आपल्याला मध मिळतं हे आपल्याला माहितीच आहे. मधमाश्यांचं आपल्या जीवनातील महत्वंही माहिती आहे. मात्र मधमाश्यांना आईसक्रीम (Ice Cream)आवडतं ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. कसं ते जाणून घेऊया. (World Honey Bee Day 2021 know about bees who likes Ice cream)

आता तुम्हाला वाटत असेल की मधमाश्या तुमच्या आमच्यासारखं व्हॅनिला, बटरस्कॉच, चॉकलेट या फ्लेवर्सचं आईसक्रीम खातात की काय? तर असं अजिबात नाही. मधमाश्या, फुलपाखरं आणि कीटक फुलांमधील परागकण किंवा मकरंद खातात हे तुम्हाला माहिती असेलच. मकरंद म्हणजेच झाडावरील फुलांच्या मध्यभागी असणारा लहान भाग. मधमाश्यांना आईसक्रीम क्रिपर (Ice cream creeper) नावाच्या झाडांना लागणाऱ्या फुलांमधील मकरंद (Nectar) अतिशय आवडतो. हा मकरंद चवीला अगदी आईसक्रीमसारखा लागतो. म्हणूनच या झाडावर शेकडो मधमाश्यांची गर्दी असते.

पर्यावरण प्रेमींच्या म्हणण्यानुसार, आईसक्रीम क्रिपर या झाडाला लागणाऱ्या फुलांच्या मध्यभाग असणारा मकरंद अगदी साखरेसारखा गोड असतो. तसंच याची चव व्हॅनिला आईसक्रीमसारखी लागते. त्यामुळे मधमाश्या या फुलांकडे आकर्षिल्या जातात. हे झाड मधमाश्यांचं आवडतं झाड आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे.

कोणत्या मधमाश्यांना आवडतं आईसक्रीम

साधारणतः आकारानं लहान 'सातरी' म्हणजेच Apis Cerana प्रजातीच्या मधमाश्या या आईसक्रीम झाडांवर बघायला मिळतात. या मधमाश्या आकारानं लहान असल्यामुळे सहज फुलांमधील मकरंद खाऊ शकतात. इतर प्रजातीच्या मधमाश्या तुलनेनं मोठ्या असल्यामुळे लहान फुलांमधील मकरंद खाऊ शकत नाहीत.

काय आहे आईसक्रीम क्रिपर

आईसक्रीम क्रिपर ही एक प्रकारचं फुलझाड आहे. जायला बाराही महिने फुलं येत असतात. याला कोरल वेली, होनोलुलु क्रिपर आणि मेक्सिकन क्रिपर म्हणून देखील ओळखलं जातं. हे मूळचं मेक्सिकोचं असलं तरी ते भारतात सर्वत्र वाढतं.

कोणत्या भागात आढळतात

आईसक्रीम क्रिपर हे विशेष करून डोंगराळ प्रदेश आणि किनारी प्रदेशात आढळतात. या झाडाला गुलाबी रंगची फुलं आढळून येतात.

मधमाश्या हा निसर्गातील अतिमहत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे निसर्ग आणि निसर्गाचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर मधमाश्यांना जपणं आणि त्यांचं संवर्धन करणं महत्वाचं आहे.
- डॉ. श्रीनाथ कवडे, पर्यावरण प्रेमी

(World Honey Bee Day 2021 know about bees who likes Ice cream)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT