maha_covid 
महाराष्ट्र बातम्या

चिंताजनक! राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरुच, दिवसभरात ५० मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आजही मोठी वाढ झाली असून दिवसभरात सुमारे १००० रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर ५० बाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.२१ टक्के झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.

टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज १६,६२० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून नवीन ८,८६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एकूण २१,३४,०७२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण १,२६,२३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.२१ टक्के झाले आहे. सध्या ५,८३,७१३ करोना बाधित सध्या होम क्वारंटाइन असून ५,४९३ बाधित रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 

सर्वात अधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात

दरम्यान, राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुण्यात असून ही संख्या २५,६७३ इतकी आहे. त्यानंतर मुंबईत १२,५३५ अॅक्टव्ह रुग्ण आहेत.  पुण्यात दिवसभरात १,७४० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात ८५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १५ करोनाबाधितांचा आज मृत्यू झाला असून यामध्ये दोन रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरात ३५५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २,१८,२०३ वर पोहोचली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ११,५९० इतकी आहे. शहरात आजवर ४,९५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर आजवर २,०१,६६१ डिस्चार्ज झाले आहेत. दरम्यान, आज ९,१२२ नमुन्यांच्या स्वॅबची तपासणी झाली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT