Amruta Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadanvis: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस म्हणाल्या, 'अजित पवारच...'

पुण्यातील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमातही अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'सकाळ' माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे.

त्या म्हणाल्या की, "अजित पवारच नाहीत तर महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल". पुण्यातील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

"मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल", असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर या प्रश्नावर त्या म्हणाल्या, मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला पुढे नेतो तो व्यक्ती किंवा पक्ष चांगला आहे. मग तो कोणीही असला तरी चालेल.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्यात मैत्री कशी आहे, यावर अमृता म्हणाल्या की, हे माझ्यापेक्षा त्या दोघांना जास्त माहीत आहे. राजकारणी लोक त्यांच्या मैत्रीत अनेकदा डोळे मारतात, असा खोचक टोलाही अमृता फडणवीसांना अजित पवार यांना लगावला आहे.

पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची काल मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT