Anil Parab Esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Parab : सोमय्यांच्या आरोपावर अनिल परबांकडे लेखी पुरावे म्हणाले, सोमय्यांना नाक घासायला...

अनिल परब यांच्यामध्ये आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत तीन तास बैठक झाली

सकाळ डिजिटल टीम

म्हाडाच्या बिल्डिंगमधील माझे अनधिकृत कार्यालय असल्याचा जो आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता तो खोटा असल्याचं म्हाडाने दिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं आहे असं शिवसेना नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या हे खोटे बोलत असून त्यांच्यावर मी बदनामीचा गुन्हा दाखल करत आहेत. किरीट सोमय्या केवळ मला बदनाम करण्यासाठी आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर आता अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयात भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. म्हाडाच्या ज्या अधिकाऱ्याने मला ही नोटीस पाठवली त्याच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलं. 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यामध्ये आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत तीन तास बैठक झाली. याबाबत त्यांच्यामध्ये सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांवर सविस्तर चर्चा झाली. त्यासंबधी सर्व माहिती अनिल परब यांनी दिली आहे. अनिल परब माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेली दीड वर्ष भाजप नेते किरीट सोमय्या माझ्यावर आरोप करत आहेत. ही जागा माझी नाही असं मी सांगत होतो. यासंदर्भात मला म्हाडाकडून मला पत्र देण्यात आलं आहे. त्यामध्ये हे कार्यालय आणि जागा माझी नाही माझा त्या जागेशी, कार्यालयाशी संबध नाही याबाबतच पत्र म्हाडाकडून मला देण्यात आलं आहे.

किरीट सोमय्या यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत. त्याबाबत म्हाडाने सविस्तर पत्र दिलं आहे. किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप खोटे आहेत. म्हाडाचं कार्यालय वापरण्याची परवानगी त्यांनी मला दिली आहे. सोमय्या यांनी केलेले आरोप खोटे आहेत. या संदर्भात म्हाडाने मला लेखी पत्र दिले आहे. या कार्यालयाचा आणि अनधिकृत बांधकामाचा माझा काहीही संबध नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

तर यासंबधीचा पाठपुरावा न करता अधिकाऱ्यांनी मला नोटिस पाठवली आहे. त्यांच्यावरतीही कारवाई करण्यात यावी. गांधीनगर वांद्रे पूर्व येथील जमीनीचा संबध अनिल परब यांच्याशी नाही. यासंबधी सर्व माहिती लेखी स्वरूपाची उपलब्ध आहे. किरीट सोमय्या लोकांची घरे फोडत आहेत. ही भूमिका भाजपची आहे का? असा सवालही यावेळी अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. अशा स्वरूपाच एक लेखी पत्र म्हाडाने अनिल परब यांना दिलेलं आहे. याबाबत मी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा लावला आहे 100 कोटीचा दावा असून हे लेखी पत्र याचा पुरावा असून मी सोमय्या यांना नाक घासायला लावणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT