Amruta Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnvis Security: "मलासुद्धा सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जगू द्या" अमृता फडणवीस यांनी नाकारली सुरक्षा

सकाळ डिजिटल टीम

राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना नुकतीच वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती. मात्र, आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र, त्यांनी ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन सुरक्षा स्विकारण्यास नकार दिला आहे.(Y+ Escort Security but wish to live like common citizen of Mumbai humbly request for Amruta Fadnavis )

मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला ही सुरक्षा नको अशी विनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत केली आहे.

अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमृता फडणवीस या कुठेही प्रवास करतील तेव्हा ट्रॅफिक क्लीअरन्स व्हेईकल त्यांच्यासोबत असेल. अमृता फडणवीस यांनी वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली नव्हती. पण अमृता फडणवीस यांना असलेला धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच अमृता यांच्याकडून ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलकची मागणीही करण्यात आली नव्हती.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्विट करत या सुरक्षेला विरोध दर्शवला आहे. 'मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. माझी नम्र विनंती. मुंबई पोलिस मला ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन प्रदान करू नका. असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT