Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Yakub Memon: कबरीच्या वादावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण केल्यावरून पेटलेल्या वादावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अशा समाजकंटकांना कुणीच महत्त्व देऊ नये असं म्हणत या सरकारचा जनतेचं विकास कामापासून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

(Ajit Pawar On Yakub Memon Grave decoration)

या प्रकरणावर संताप व्यक्त करत अजित पवारांनी सकारवर निशाणा साधला आहे. "यासंदर्भात मला माहिती नाही, आता मी माहिती घेतो पण अशा समाजकंटक आणि देशद्रोह्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू नये." असं पवार म्हणाले. त्याचबरोबर "असे काहीतरी मुद्दे काढायचे आणि जनतेचं मन विचलीत करायचं. यांच्याकडे बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर बोलण्यासाठी उत्तरं नाहीत. सध्या राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. रोज आत्महत्या होत आहेत. या प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. या प्रश्नावरून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जात आहे." असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, ही घटना कुणाच्याही सरकारच्या काळात व्हायला नव्हती पाहिजे, अशा घटना होऊ नयेत असं ते म्हणाले. त्याचबरोबर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा मान हा दरवर्षी शिवसेनाच असतो पण शिंदे गट आणि शिवसेनेत चाललेल्या मेळाव्याच्या वादावरील निर्णय न्यायालय देईल असं मत पवारांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT