yashomati thakur yashomati thakur
महाराष्ट्र बातम्या

अखिलेश यादवांनंतर यशोमती ठाकूरांचे ट्विट; मोदींना म्हणाल्या...

मजुरांना कोविडमुळे शेकडो किलोमीटर उपाशी-तापाशी स्थलांतर करावे लागले त्या मजुरांसोबत जेवण

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी सोमवारी काशी विश्वनाथ धामच्या (Kashi Vishwanath Dham) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी सर्वांत आधी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केली यानंतर गंगा नदीमध्ये (River Ganga) स्नान केले. ते त्याठिकाणाहून पवित्र गंगाजल घेऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये आले. अस केल्याने पापक्षालन होईल असं वाटतंय का, असा सवाल महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी उपस्थित केला.

आज काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाआधी मोदींनी एका प्रार्थना समारोहामध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी या परियोजनेत काम करणाऱ्या कामगारांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत जेवण केले. यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शेवटच्या काळात व्यक्ती वाराणसीलाच जातो, असे वक्तव्य केले. यानंतर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आमदार यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून लक्ष वेधून घेतले.

‘ज्या गंगेत त्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रेतं तरंगली त्या गंगेत स्नान, ज्या मजुरांना कोविडमुळे शेकडो किलोमीटर उपाशी-तापाशी स्थलांतर करावे लागले त्या मजुरांसोबत जेवण. याने पापक्षालन होईल असं वाटतंय का?’ असे ट्विट (tweet) करून यशोमती ठाकूर यांनी नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला.

कोरोनाकाळात अनेकांचे हाल झाले. उपाशी-तापाशी स्थलांतर करावे लागले. अनेक दिवस उपाशी राहावे लागले. तसेच मृतदेह जाळण्‍यासाठी कुटुंबीयांना जागा मिळाली नाही. गंगेत अनेकांचे मृतदेह तरंगत होते. यामुळे सरकारवर टिकाही झाली होती. हाच धागा पकडून यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पापक्षालन होईल असं वाटतंय का, असा प्रश्न विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT