Yashomati Thakur Yashomati Thakur
महाराष्ट्र बातम्या

यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने वाद; ट्विट करीत म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते. शरद पवार हे आपल्या सोबत आहेत. म्हणून कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र स्थिरच राहणार, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात केले होते. आता त्यांनी ‘माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे’ असे म्हटले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. परंतु, आज काळाची गरज आहे. पवारसाहेब आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करतात. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असेही यशोमती ठाकूर रविवारी अमरावतीत म्हणाल्या होत्या. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरू झाली.

यशोमतीताई, मला तर असे वाटते की माननीय पवार साहेबांना यूपीएचे अध्यक्ष करावं! त्यामुळे तर पूर्ण भारताला उपयोग होईल! देता प्रस्ताव? असे ट्विट शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर केले होते. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना हा विषय इगोवर घेऊ नका, असे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

‘मला असं वाटतं की, माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार (sharad pawar) साहेब यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचा राजकीय वकूब यांची महाराष्ट्राला नितांत आणि नेहमीच आवश्यकता राहिलेली आहे. महाराष्ट्र राज्याला आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणून ते हवेच आहेत, असे ट्विट स्पष्टीकरण देताना यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT