mahadev jankar 
महाराष्ट्र बातम्या

"यशवंतराव चव्हाण झाले नाहीत पण मला पंतप्रधान करा, १० मिनिटात..."; माजी मंत्र्याचे वक्तव्य

Sandip Kapde

Mahadev Jankar: माजी मंत्री महादेव जानकर यांना पंतप्रधान पदाचे वेध लागले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या हातात नाही. मला पंतपधान करा, दिल्लीत रासपची सत्ता आणा, आरक्षणाचा मुद्दा दहा मिनिटात सोडवतो, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पंतप्रधान ज्याच्या बाजूने असतो त्याबाजूने निर्णय असतात. मला पंतप्रधान करा, यशवंतराव चव्हाणसाहेब नाही झालेत. मला संधी द्या. दहा मिनिटात आरक्षणाचा प्रश्न सोडवतो.आम्ही बेरोजगारीचा प्रश्न देखील सोडवू. सर्व प्रश्न सोडून १५ लाख नाही तर किमान १५ हजार तरी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू, असे महादेव जानकर म्हणाले. (Latest Marathi News)

बळीराजा शेतकरी संघटनेने ऊस व दूध दराबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यासाठी जानकर येथे आले होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. यावेळी जानकर बोलत होते.

महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील सरकारवर टीका केली. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत असणाऱ्या शेतकऱ्याला राज्यकर्त्याकडे भिक मागावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. ही सिस्टीम बदलली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे महादेवर जानकर म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT