Maharashtra Weather Update sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला 'येलो अलर्ट...'! पुढील ३ दिवसात 'या' १९ जिल्ह्यांना बसणार वादळी वाऱ्याचा तडाखा

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत पावसाच्या सरी कोसळतील. त्यासाठी हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत पावसाच्या सरी कोसळतील. त्यासाठी हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या भागाला गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्याचा तडाखा बसत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सोमवारी (ता. २०) राज्याला हवामानाचा कोणताही इशारा असल्याची स्थिती सध्या दिसत नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतो. त्यामुळे तेथील हवामानात वेगाने बदल होतात. त्यानुसार या अंदाजामध्ये दोन ते तीन दिवसांनी काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असेही विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या.

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळे मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. रायलसीमा आणि उत्तर तमिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उन्हाचा चटका कमी

राज्यात वळिवाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांनी होरपळून निघालेल्या राज्याला काही अंशी दिलासा मिळाला. मात्र उकाडा कायम आहे. राज्यात शनिवारी (ता. १८) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. कमाल तापमान कमी-जास्त होण्याचा अंदाजदेखील विभागाने वर्तविला आहे.

या जिल्ह्यांना इशारा...

अहमदनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT