Maharashtra Weather Updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात रविवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहेस त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यात पावसाचं पुनरागमन झालं आहे. काल (रविवारी)ही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुण्यात आणि मुंबईतही आज पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेली नाहीये.

दरम्यान मात्र पुढील ३ दिवस (मंगळवार, बुधवार आणि गुरुवार) पुण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढचे 3-4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

Marathi News Live Updates : जयपूर परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत TCS iON चे निवेदन

Velhe News : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सहकाऱ्यांसह राजगडावर श्रमदान

SCROLL FOR NEXT