Yin Ministry 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Yin Ministry 2024 : ‘यिन’च्या केंद्रीय कॅबिनेट समितीच्या सभापतिपदासाठी चुरस;ऑफलाइन पद्धतीने रविवारी मतदान

सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’च्या माजी विद्यार्थ्यांसाठी ‘यिन’ केंद्रीय कॅबिनेट समिती स्थापन करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’च्या माजी विद्यार्थ्यांसाठी ‘यिन’ केंद्रीय कॅबिनेट समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची सभापती आणि दहा समितीच्या अध्यक्षपदांची निवडणूक रविवार (ता.२१) राज्यातील ‘सकाळ’ च्या जिल्हा कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

‘यिन’च्या स्थापनेपासून गेल्या दहा वर्षांतील हे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा ‘यिन’च्या चळवळीत मोठ्या उत्साहाने जवळच्या उमेदवार मित्राचा प्रचार करताना दिसत आहेत. काही उमेदवारांनी‘मी निवडून आल्यावर विविध राज्यांतील शिक्षण, कृषी, आरोग्य, उद्योजकता, व्यापार यावर अभ्यासदौरे करणार आहे,’ अशी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. काही उमेदवारांनी निवडून आल्यावर परदेशातील शिक्षणप्रणाली कशी आहे, उद्योग व्यवसायातील मिळत असलेली चालना यावर अभ्यास करणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

सभापतिपदाबरोबर इतर समितीच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच असल्याचे दिसत आहे. समितीचा अध्यक्ष झाल्यावर समितीत सखोल काम केल्याचा अहवाल तयार करून तो केंद्रीय मंत्री, देशाचे पंतप्रधान यांना द्यायचा आहे. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे. मतदारयादी जाहीर झाली असल्यामुळे उमेदवार ‘मला देशासाठी काही तरी करायचे आहे,’ ही राष्ट्रप्रेमाची भावना मनात घेऊन राज्यभरातील मतदारांमध्ये प्रचार करण्यात दंग झाली आहे. या ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या मतदानाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी चारपर्यंत आहे. त्यानंतर मतदान मोजणीला सुरुवात होईल. अधिक माहितीसाठी ‘यिन’चे राज्य समन्वय अधिकारी अनिकेत मोरे मोबाईल क्रमांक. ७०५८१ ५११११ यांच्याशी संपर्क साधावा.

मतदानाला येताना...

  • मतदाराने सत्यता पडताळणीसाठी ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड) सोबत घेऊन यावे.

  • मतदान करताना मतपत्रिकेवर इंग्रजी अंकात उमेदवाराचा पसंतीचा क्रमांक लिहावा.

मतदानाचे ठिकाण

  • जिल्हा ‘सकाळ’ कार्यालये पुढीलप्रमाणे-

  • कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, नागपूर, अमरावती, नाशिक, ठाणे, परेल, बेलापूर.

सभापती पदासाठीचे उमेदवार आणि पसंती क्रमांक

पसंती उमेदवाराचे

क्रमांक नाव

1 अजय खांडबहाले

2 अक्षया साळोखे

3 अनिकेत बनसोडे

4 डॉ. उमेश चव्हाण

5 गीतांजली देवकर

6 प्रज्वल ढाणे

7 प्रवीण कोळपे

8 राजश्री राजेमाने

9 रोहित पाटील

10 सलोनी सिंह

11 संध्या वाघमारे

12 सत्यजित कदम

13 सायली वाडदेकर

14 सुदर्शन सरनाईक

15 सुजित मासाळ

16 विजय यादव

17 विनायक वाडिले

18 विश्वजित पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT