yin
yin sakal
महाराष्ट्र

‘यिन’च्या अधिवेशनाची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘सकाळ ’ माध्यम समूहाचे ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) तर्फे आयोजित शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असून त्याची मुंबईत जय्यत तयारी सुरू आहे. २४ ते २६ फेब्रुवारी या तीन दिवसात सकाळी ११ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यिन मंत्रिमंडळाला शपथ देणार आहेत. (YIN)

अधिवेशनादरम्यान महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर, संस्थापक अध्यक्ष एस.एम.ई चेंबर्स ऑफ इंडिया चंद्रकांत साळुंखे, प्रसिद्ध व्याख्याते सागर पाठक, अर्थतज्ज्ञ भूषण गोडबोले, चित्रपट कलाकार ओंकार भोजने, गौरव मोरे, प्राजक्ता माळी, स्वप्नील बांदोडकर, राजेश शिंगारपुरे, शिल्पा तोळसकर केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार संभाजीराजे छत्रपती, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, पशू संवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार अमोल कोल्हे, उपसचिव कौशल्य विकास रोजगार, व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब आर्थिक महामंडळ डॉ. नामदेव भोसले, सहसचिव महसूल व वनविभाग मंत्रालय संजय इंगळे, ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, आयपीएस अधिकारी निसार तांबोळी, ‘सकाळ माध्यम समूहा’चे सीईओ उदय जाधव, अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद दादा पै, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सामाजिक क्षेत्रातील यजुर्वेद महाजन, पोपटराव पवार, ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी, सेवाभावी युवकांचा नेता भीमेश मुतूला, उद्योजक पंकज दुजोडवाला, उद्योजक सारिका महोत्रा, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ श्रद्धा जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शिवाय यिन मंत्रिमंडळ निवड समितीचे प्रमुख गजानन मोरे, महेश धुमशेटवार, तसेच ‘सकाळ’चे (पुणे) संपादक सम्राट फडणीस हेही अधिवेशनाला उपस्थिती असतील.

सहा विषयाचे मंथन

‘यिन’च्या अधिवेशनात सहा प्रमुख विषयवार विचार मंथन करून प्रत्यक्ष कृती आराखडा तयार होणार आहे. यामध्ये योग व ध्यान, आर्थिक साक्षरता, उद्योजकता कौशल्य, सर्जनशील विचार, भावनिक आणि मानसिक आरोग्य, सेवा आदी विषयांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT