Satyajeet Tambe sakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : केंद्राप्रमाणे राज्य शासनाने ही क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा

केंद्राप्रमाणे राज्य शासनाने ही क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधान परिषदेत केली.

प्रतिनिधी

मुंबई - राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व क्रीडा प्रकारांमध्ये योगासनाचा समावेश करण्यात यावा. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने ही क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधान परिषदेत केली. या मागणीवर उत्तर देताना याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत चर्चेत सहभागी होताना योगासनाचा समावेश शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये करण्याची मागणी केली. ते म्हणाले, शिक्षण क्षेत्र, नोकरी, पुरस्कार, किंवा राज्यशासनाच्या बाबतीत हे सगळे लाभ योगासन खेळाडूंना मिळाले पाहिजे.

योगासन या क्रीडा प्रकाराचा २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश केला गेला आहे. सन २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला १४० मेडल मिळाले, त्यामध्ये १६ मेडल योगासनामध्ये मिळाले, त्यामुळे सरकारने या पुरस्कारांमध्ये योगासनाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले, याबाबत तपासू व निर्णय घेऊ मात्र योगासनाचा अंतर्भाव करायलाच पाहिजे असा वरुन निर्णय आहे. त्यामुळे तपासण्याची गरज नाही, योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घ्या, असे निर्देश उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिठासनावरुन दिले.

केंद्राने योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे तर राज्य सरकार देखील योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करेल व लवकरच याचा निर्णय घेतला जाईल, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

सभापतींच्या निर्देशांची तत्काळ कार्यवाही करुन योगासनाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता द्या, आ. सत्यजीत तांबे यांचे क्रीडा मंत्र्यांना पत्र केंद्र सरकारने क्रीडा मंत्रालयातर्फे योगासन हा क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये योगासनांचा सामावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत सर्वाधिक पदके महाराष्ट्राने मिळवली.

योगासनांचा शालेय आणि विद्यापीठांच्याही अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्र शासनाने योगासनाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे योगासन या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना नोकरी, शैक्षणिक आणि क्रीडा पुरस्कार अशा प्रकारच्या लाभांपासून वंचित रहावे लागत आहे.

याबाबत संदर्भीय प्रश्नाच्या चर्चेदरम्यान विधान परिषदेच्या सभापतींनी योगासनाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याचे स्पष्ट निर्देश पिठासनावरुन दिले आहेत. त्यावर आपण तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

जेणेकरून योगासन या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना शासनाच्या पुरस्कार, नोकर भरती मधील आरक्षण, शैक्षणिक आणि इतर सवलती प्राप्त होतील, अशी मागणी करणारे पत्र आ. सत्यजीत तांबे यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कालच्या मोठ्या वाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त! एक तोळा सोन्यासाठी आता किती पैसे लागणार? पाहा आजचा ताजा भाव

Shiv Jayanti Chaos Kolhapur : कोल्हापुरात शिवजयंतीच्या उत्साहात हुल्लडबाजी; सायलेंसर काढून धिंगाणा, गावकऱ्यांनी चोपला

Home Remedies For Blackheads: ब्लॅकहेड्समुळे चेहरा काळवंडला आहे ? 'या' ३ घरगुती उपायांनी उजळेल सौंदर्य, नाक चमकेल आरशासारखे

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर जाणं कठीण नाही- संजय राऊत

‘नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र! ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित

SCROLL FOR NEXT